भारती विद्यापीठ इंग्लिश स्कूलचे दहावी परिक्षेत यश

विटा येथील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलने दहावी बोर्ड परिक्षेत यश संपादन केले. दहावी बोर्ड परिक्षेत शाळेचा शंभर टक्के  निकाल लागला असून वेदिका विनोद जगदाळे (९६.६० टक्के)  गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.

 जान्हवी मधुकर शेट्टी हिने ( ९५.८० टक्के) गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. नेहा विद्याधर पवार हिने (९४.८० टक्के) गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठ शालेय समिती अध्यक्षा विजयमाला कदम यांनी यशस्वी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचा पाठिंबा या त्रिसूत्रीवर आमचे यश आधारित असल्याचे मत प्रभारी प्राचार्या शीला दिवटे यांनी व्यक्त केले.