प्रसंगी काँग्रेस रस्त्यावरची लढाई लढेल

विटा, सरकार विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रसंगी काँग्रेस पक्ष रस्त्यावरची लढाई लढेल,असा इशारा माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी दिला.

खानापूर तालुका आणि विटा शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्व्भूमीवर आम्ही दौरे सुरु केले आहेत. खानापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी नियमित संवाद साधून पक्ष संघटनेची बांधणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट ) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) यांची चांगली ताकद असल्याने महाविकास आघाडी एकसंघपणे निवडणूक लढल्यास गटबाजीमध्ये विभागलेली आहे. या प्रश्नावर डॉ. कदम म्हणाले, बराच काळ निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्याची चाचपणी करण्याची संधी मिळाली. नव्हती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ती संधी मिळणार आहे. स्थानिक पातळीवर आम्ही योग्य कार्यकर्त्यांच्या मागे संपूर्ण ताकदीने उभे राहू . लवकरच खानापूर आणि विटा शहर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल केले जातील. पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

विटा येथे आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील जितेश कदम, यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यातील पावसाने झालेल्या नुकसानीवर बोलताना ते म्हणाले , सध्याचे सरकार असंवेदनशील असून, त्यांनी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही . सरकारला जागे करण्यासाठी विधिमंडळात मी स्वतः आणि दिल्लीत खासदार विशाल पाटील पोटतिडकीने भूमिका मांडत आहोत.

यावेळी खासदार विशाल पाटील , जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, डॉ. जितेश कदम , अशोकराव गायकवाड, रवींद्र देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.