कोल्हापूर जिल्ह्यात ३० ऑगस्टपासून १३ सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश लागू

कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सव तसेच इतर यात्रा, सण उत्सव साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या कारणांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी ३० ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते १३ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे. लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.