कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप आहे. तर ग्रामीण भागात पावसाची संततधार कायम आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ही 35 फूट 8 इंचावर स्थिर असून 46 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.46 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. मध्यरात्री राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा हा उघडला असून 2928 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
त्यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून पावसाची उघडझाप असल्याने पाण्याखाली गेलेले बंधारे ही आता खुले होण्यास सुरुवात झाली आहे.