सद्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आतुर झालेले आहेतच. मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात देखील केलेली आहे. महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेचा उमेदवार कोण यावर पडदा पडल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत एकमत झाल्याने ही जागा काँग्रेसला दिल्याचे जवळपास निश्चित मानले जाते.
काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचे निश्चित आहे. त्याबदल्यात मुंबईतील काँग्रेसच्या वाट्याची जागा शिवसेनेला दिली जाणार असल्याची माहिती आहे. उद्या (मंगळवारी) मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.