खानापूर घोटी बुद्रुक तलावाच्या कामाचा शुभारंभ सुहासभैय्या बाबर यांच्या हस्ते…

खानापूर तालुक्यातील घोटी बुद्रुक येथील साठवण तलावासाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ
करण्यात आला.घोटी बुद्रुक येथे साठवण तलाव बांधण्यासाठी स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या तलावासाठी अनेक प्रकारची विघ्ने येत होती. कधी हा तलाव तांत्रिक बाबीत अडकायचा तर कधी वनखात्याची परवानगी नसायची. एक पिढी संपली, दुसरी पिढी निम्मी पुढे गेली, आता नवी पिढी आली आहे. पण या तलावासाठी स्वर्गिय भाऊंनी तळमळ सोडली नाही. अखेर हा तलाव मंजूर करूनच आणला, त्यांचे हे ऐतिहासिक काम आहे.

ते भविष्यातील अनेक पिढ्यांना लक्षात राहील. आज या साठवण तलावाचे भूमिपूजन करताना अक्षरशःडोळे भरून येत आहेत, अशा भावना घोटी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.यावेळी सुहास बाबर म्हणाले, आयुष्याच्या अखेरपर्यंत एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करावा याचे उदाहरण बारा कोटींचा निधी मंजूर स्वर्गीय अनिलभाऊंनी दाखवून दिले. घोटी बुद्रुकच्या डोंगरदऱ्यात या साठवण तलावाचे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. भविष्यात हे ठिकाण उंचावरून कोकणाचीच अनुभूती देईल व तो परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल, अशी मला खात्री आहे. काही कामे आयुष्यभर स्मरणात राहणारी असतात, घोटी बुद्रुकचा साठवण तलाव त्यापैकी एक असेल असे उद्गार युवक नेते सुहास बाबर यांनी यावेळी काढले.