सांगोला शहरात छत्रपती शिवाजी चौक सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. अनेक वर्षापासून तालुक्यातील संबंध शिवप्रेमींची उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा शहरात लवकरात लवकर उभा राहावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठकीत आयोजित करावी अशी मागणी ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी लेखणी द्वारे केली आहे. सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या चबुतऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच याबाबतचे अन्य महत्वपूर्ण काम हे पूर्ण झाले आहे. सांगोला शहरात छत्रपती शिवाजी चौक सांगोला येथे शिवरायांचा पुतळा लवकरात लवकर बसावा ही शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला यांच्या मुख्य पदाधिकारी आणि शिवप्रेमी जनतेची आग्रही मागणी आहे. याबाबत मंजुरीसाठी विहित नमुन्यात प्रस्तावित संबंध प्रशासनाकडे दाखल केले आहेत.
Related Posts
खा. रणजितसिंह निंबाळकरांच्या जनता दरबारातून समस्यांचा जागेवरच निपटारा
माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या जनता दरबारात सांगोला शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी आपली गाहाणी आणि प्रश्न मांडण्यासाठी मोठी गर्दी केली…
दिपकआबांच्या उपस्थितीत बुध्देहाळ गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश! विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार
शेतकरी कामगार पक्षाचे सध्याचे नेतृत्व विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या…
‘एकच वादा दिपकआबा’ कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष!
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झाली. त्यात सांगोला मतदारसंघात दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.शिवसेना…