उद्या मिलेट फेस्टिव्हल व हुरडा पार्टी…..

सोलापूर जिल्हा जरी दुष्काळ भाग म्हणून जरी ओळखीस असला तरी अनेक उपक्रम देखील राबविले जातात. ज्यांचा लाभ हा प्रत्येक नागरिकाला होत असतो. तर आता सोलापूर जिल्ह्यात मिलेट फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. जागतिक मिलेट (तृणधान्य) वर्षानिमित्त बसव संगम शेतकरी गट ड्रीम फाऊंडेशन व सावली फाऊंडेशन, बालाजी अमाईन्स, सपोर्ट टू फार्मर उपक्रम, बालाजी सरोवर इव्हेंट पार्टनर व चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा.लि. यांच्या प्रायोजक व बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष सहकार्याने बुधवारी (दि. ३१) सकाळी १० ते रात्री १० पर्यंत हॉटेल बालाजी सरोवर येथे मिलेट फेस्टिव्हल व हुरडा पार्टीचे आयोजन केल्याची माहिती कोमल ढोबळे – साळुंखे यांनी दिली. महिलांनी व कृषी उद्योजक कंपन्यांनी तृणधान्यांपासून बनविलेले खाद्यपदार्थ विक्री स्टॉल व शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे.

यंदाचे वर्ष हे जागतिक तृणधान्य (मिलेट) म्हणून साजरे होत आहे. सोलापूरला ज्वारीचे कोठार म्हटले जाते. अस्सल सोलापुरी हुरडा पार्टी या नावाने ड्रीम फाऊंडेशन आणि बसव संगम शेतकरी गट गेल्या तीन महिन्यांपासून भारतभर हुरडा पार्टीचे आयोजन करत आहे.

मिलेट महोत्सवात मिलेट पाककला स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा, हळदी-कुंकू कार्यक्रम, युवक उद्योजकांना नवीन व्यवसायासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि गीतसंगीत सांस्कृतिक कार्यक्रम व ज्ञानकुंज विद्यापीठ, करांडे इंटरनॅशनल स्कूल व ज्यु. कॉलेज, जुजानपूर, सांगोला येथील विद्यार्थ्यांचा पारंपरिक स्वागत, बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम व मल्लखांब प्रात्यक्षिक असणार आहे. या पत्रकार परिषदेस संगीता पाटील, ईश्वर क्षीरसागर उपस्थित होते.