राजकोट किल्ल्यावर पुन्हा छत्रपती शिवरायांचे स्मारक व भव्य पुतळा उभा करावा आमदार दीपक आबा साळुंखे पाटील

अखंड भारत देशाचे प्रेरणास्थान आणि अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना होणे अत्यंत निंदनीय आहे .मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आणि शक्तिशाली पुतळा उभा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

मालवणी येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळा शासन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटनाग्रस्त झाला .ही बाबा अत्यंत वेदनादायक आणि मनाला संताप आणणारी आहे .युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच उभारत असताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे यावरून समोर येत आहे. केवळ आठ महिन्यात पुतळा दुर्घटनाग्रस्त होतो हे अनकलनीय आहे .राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. जराही विलंब न करता मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा शौर्याचा इतिहास सांगणारे भव्य स्मारक उभं करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.