सांगोल्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने आघाडी केली, अन् चिन्ह वेगवेगळी मिळाली..! जिल्हाध्यक्षाच्या वाट्याला तर आलाय चक्क पांगुळगाडा!

सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने शेकापसोबत आघाडी केली आणि त्याचाच गोंधळ झाला. आघाडीमुळे भाजपच्या नगरसेवक उमेदवारांना आपलं ओळखीचं कमळ चिन्ह मिळालंच नाही.

प्रत्येकाला वेगवेगळं, अपक्षांचं चिन्ह दिलं गेलं.

भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या पत्नीला तर थेट पांगुळगाडा हे चिन्ह मिळालं. म्हणजे लोकांनी त्यांचा प्रचार बघताना उमेदवार कोणत्या पक्षाचा? यापेक्षा नेमकं चिन्ह मिळालं त्यावरच बोलायला सुरुवात केली आहे. कमळ दिसत नाही, पण पांगुळगाडा मात्र गावभर धुमाकूळ घालत आहे!

शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांच्या तंबूत मात्र कोणताही गोंधळ नाही. त्यांचे सर्व उमेदवार एकाच धनुष्यबाण चिन्हावर उभे आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार सरळसोट, आणि इथे भाजप-शेकाप आघाडीचा पूर्ण गोंधळ. आता भाजपला प्रत्येक वॉर्डात वेगळं चिन्ह घेऊन प्रचार करावा लागणार आहे. कुठे पांगुळगाडा, कुठे झाडू, कुठे कप… कोणत्या उमेदवाराचं चिन्ह काय आहे? हे लक्षात ठेवणं मतदारांसाठीही अवघड जात आहे.

शहाजीबापू यांनी भाजपवर आरोपही केले आहेत, मी आजारी असतानाही लोकसभेत प्रचार केला आणि 15 हजार मतं मिळवून दिली. पण विधानसभा निवडणुकीत भाजपने मला पाडण्यासाठी शेकापला मदत केली,” असा त्यांचा दावा आहे. एकूणच सांगायचं तर, सांगोला निवडणुकीत पक्षांपेक्षा चिन्हांचीच जास्त चर्चा सुरू आहे. कमळ दिसत नाही, पण पांगुळगाडा मात्र गावभर धुमाकूळ घालत आहे!