सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागलेला आहे. उमेदवारी बाबतीत तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहेत.शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये गेली चार दिवस फिल्डिंग टाईट केली जात आहे. मातोश्री येथे नव्याने व्युव्हरचना करण्यात येत आहे. दरम्यान माने यांना संधी मिळावी असे प्रयत्न अंतिम झाले आहेत त्यांची उमेदवारी निश्चित देखील मानली जात आहे.
