1 September : आधार ते गॅस सिलेंडर, आजपासून बदलणार हे 7 नियम

प्रत्येक महिन्या 1 तारखेपासून काही नियम किंवा गोष्टी बदलत असतात. नवीन गोष्ट लागू करण्यासाठी शक्यता एक तारीखच निवडली जाते. आता १ सप्टेंबर महिन्यातही अनेक मोठे बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

1- एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल होणार

एलपीजी सिलिंडरच्या दरात दर महिन्याला बदल होत असतात. कधी तेल कंपन्या किंमत वाढवतात तर कधी कमी करतात. अशा परिस्थितीत यावेळीही एलपीजीच्या किमतीत बदल होऊ शकतो. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली होती, तर जुलैमध्ये त्याची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती.

2- बनावट कॉलशी संबंधित नियम

उद्यापासून फेक कॉल्स आणि मेसेजवर नियंत्रण ठेवता येणार आहे. यासाठी ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना असे कॉल्स आणि फेक मेसेजेसवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रायने याबाबत कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. TRAI ने Jio, Airtel, Vodafone, Idea, BSNL यांसारख्या दूरसंचार कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत टेलिमार्केटिंग कॉल्स आणि 140 मोबाइल नंबर सीरिजपासून सुरू होणारे व्यावसायिक मेसेजिंग ब्लॉकचेन आधारित DLT म्हणजेच डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यास सांगितले आहे.

3- ATF आणि CNG-PNG चे दर बदलणार

एलपीजी सिलिंडरबरोबरच, हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमतीही तेल बाजारातील कंपन्या दर महिन्याला बदलतात.

4- क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल

HDFC बँकेने युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित केली आहे, हा नियम 1 सप्टेंबरपासून म्हणजेच उद्यापासून लागू होईल. या अंतर्गत, ग्राहकांना या व्यवहारांवर दरमहा केवळ 2,000 पॉइंट मिळू शकतात. थर्ड पार्टी ॲपद्वारे पेमेंट केल्यास HDFC बँक कोणतेही बक्षीस देणार नाही.IDFC फर्स्ट बँक सप्टेंबर 2024 पासून क्रेडिट कार्डवर देय असलेली किमान रक्कम कमी करणार आहे. पेमेंटची तारीख देखील 18 वरून 15 दिवसांपर्यंत कमी केली जाऊ शकते. याशिवाय, 1 सप्टेंबर 2024 पासून, UPI आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी RuPay क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सेवा प्रदात्यांचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांप्रमाणेच रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.