सांगोला तालुक्यातील सोनंद गावामधून एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे. सांगोला तालुक्यातील सोनंद गावचे सुपुत्र तेजसिंग रमेश साळुंखे (वय ३६) हा जवान गुवाहाटी येथे कर्तव्यावर तेजसिंग साळुंखे असताना रविवारी पहाटे चारच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने वीरमरण आले.जवान तेजसिंग साळुंखे यास वीरमरण आल्याचे समजताच संपूर्ण सोनंद गावावर शोककळा पसरली आहे.
त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, चार मुली, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.तेजसिंग रमेश साळुंखे हे सन २००८ साली इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स (सेक्टर-१०) मध्ये भरती झाले होते. बेळगाव येथे प्रशिक्षण झाल्यानंतर लेहलडाख (जम्मू काश्मीर) येथे सन २००९ साली कर्तव्यावर हजर झाले होते.गेली १५ वर्षे भारतीय सीमेवर कर्तव्य (देशसेवा) बजावल्यानंतर त्यांचे प्रमोशन झाले होते. कजालंदर (पंजाब) येथून गुवाहाटी (आसाम) येथे बदली झाली होती.तेथे हजर होऊन परत सोनंद गावी सुटीवर आले होते व गेल्या १५ दिवसांपूर्वी पुन्हा ते गुवाहाटी कर्तव्यावर हजर झाले होते.दरम्यान, रविवारी पहाटे ४ च्या सुमारास ते कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराच्या धक्क्याने वीरमरण आले.
जवान तेजसिंग साळुंखे यांचे पार्थिव सोमवारी गुवाहाटी येथून विमानाने सायंकाळी पाच वाजता बेळगावी येथे आल्यानंतर त्या ठिकाणी आयटीबीपीतर्फे मानवंदना दिली जाणार आहे व तेथून अम्बुलन्समधून पार्थिव सोनंद येथे मूळ गावी आणले जाणार असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.