संभाजीराजे यांना राजकारणात येण्याची ऑफर .

स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभर चांगले वातावरण निर्माण केले आहे. मराठा आरक्षणाबाबत त्यांची पहिल्यापासूनच भूमिका सकारात्मक आहे.

त्यामुळे ते राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे’, असे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.दरम्यान, इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरूच आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनाही असून माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चेचा आपला प्रयत्न सुरूच असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

कालच (ता. ६) संभाजीराजे छत्रपती यांनी आपण २००९ ची जखम विसरलो नसल्याचे सांगत लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. या पार्श्‍वभूमीवर आज नवीन राजवाडा येथे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी श्री. पाटील आले होते. त्यावेळी त्यांची संभाजीराजे यांच्याशीही चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.