इस्लामपूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता समारंभासाठी खासदार शरद पवार हे इस्लामपूर येथे आले होते. यावेळी अनिल सावंत यांनी शिष्टमंडळासह खासदार शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर अनिल सावंत हे खा.शरद पवार व इतर मान्यवरा सोबत चर्चा करत होते.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांच्या वतीने मोठ्या घडामोडी घडताना सध्या दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पर्यायाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारी संदर्भात मोठी चर्चा होताना दिसली आहे.आणि अशा परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक असलेले अनिल सावंत यांनी खासदार पवार व राष्ट्रवादीच्या मान्यवर नेत्यांसोबत घेतलेल्या भेटीमुळे मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारी बाबत अजून कोणालाही शब्द दिलेला नाही. येत्या दोन दिवसात उमेदवारी संदर्भात निर्णय घेणार असल्याचे भेटीदरम्यान खा.शरद पवार यांनी सांगितले असल्याची माहिती भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी दिली आहे.दरम्यान भाजपच्या वतीने माजी आमदार प्रशांत परिचारक यांना महामंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याने प्रशांत परिचारक यांना महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले असून आता अनिल सावंत किंवा वसंतनाना देशमुख या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
