मा. मदन कारंडे यांनी विक्रमनगरमध्ये सुरू केले जनसंपर्क कार्यालय!

सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांची गर्दी आहे. अशातच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी कोणत्या पक्षाकडून कोणाला मिळणार? याविषयी तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. मदन कारंडे हे गेली 35 वर्षे सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत.

1991 ला ते इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक झाले आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तांत्रिक सदस्य म्हणून कार्यरत आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या कारंडे यांना जनतेला आपल्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधताना अडचणी येतात हे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी विक्रम नगर मधील घाटगे बिल्डिंगमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन, माजी नगरसेवक सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, सुहास जांभळे, सदा मलाबादे, उदयसिंग पाटील, अमरजीत जाधव, नितीन कोकणे, बाजीराव कुंभार, मच्छिंद्र नगारे, संजय कांबळे, संजय अथणे, मंगेश कांबुरे, बबन घाडगे, रामदास कोळी, माधुरी सातपुते, सयाजी चव्हाण, रणजीत शिंदे, युसुफ दुर्ग, नागेश शेजाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.