डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये नव मतदारांना मतदान जनजागृती पर मार्गदर्शन संपन्न

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय मध्ये दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वा. राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशाख विभागाच्या संयुक्त विद्यमानाने नवमतदारांना नाव नोंदणी फॉर्म नंबर ६ देऊन मतदानाचे महत्त्व विशद केले, सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आणि मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी सर यांनी केले त्यांनी बोलताना असे म्हटले की भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची लोकशाही व्यवस्था आहे परंतु या लोकशाही व्यवस्थेचा मतदार हा कणा आहे.

संसदीय लोकशाही शासन प्रणालीमध्ये लोकप्रतिनिधी मार्फत राज्य व्यवस्था चालवली जाते आणि त्या लोकप्रतिनिधींना सभागृहामध्ये पाठवण्याचं काम मतदाराच्या माध्यमातून केले जाते व भारत हा युवकांचा देश आहे आणि या युवकांनी जास्तीत जास्त मतदान नाव नोंदणी केली पाहिजे. या उद्देशाने महाविद्यालयातील तरुण-तरुणीं मतदारांना निवडणुकीचे महत्त्व सांगून नवीन मतदान नोंदणीचे फॉर्म वाटप करण्यात आले, त्याचबरोबर सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. काकासाहेब घाडगे यांनी मार्गदर्शन करताना ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत भारतामध्ये लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे.

नुसतं मतदारांनी नाव नोंदणी करून फायदा नाही तर प्रत्यक्षात मतदान केलं पाहिजे व देशाच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सहभाग झाले पाहिजे असे प्रतिपादन केले. आभारप्रदर्शन प्रा. अशोक वाकडे यांनी केले. याप्रसंगी प्रा. जोतिबा हुरदुखे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.