सांगलीच्या आष्टा येथील खोत मळा अमृत नगर रस्त्यावरील नृसिंह मंदिरासमोर झुडपात चार फुटाचे मगरीचे पिल्लू आढळल्याने नागरिकात खळबळ माजली. या मगरीच्या पिल्याला वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अमृतनगर परिसरातील नृसिंह मंदिरासमोर किंवा पाठीमागील बाजूला मोठा ओढा किंवा नदी नाही. तरीही मगरीचे पिल्लू या परिसरात कसे आले याची चर्चा सुरू आहे.
हे छोटेसे पिल्लू असून तिची आई ही या परिसरात असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्राणी मित्रांनी व नागरिकांनी मगरीचे पिल्लू पकडून ते वनविभागाच्या कडे स्वाधीन केले. या परिसरात वन विभागाच्या वतीने तातडीने शोध मोहीम राबवण्याची मागणी व्यक्त होत आहे.