चोरट्यांचा मंदिरांवर डोळा! सोळा दिवसात नऊ मंदिरांत चोरी

सध्याच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे.अनेक ठिकाणी चोरी, मारामारी, खून प्रकरणात भरमसाठ वाढ झालेली आहे इचलकरंजी शहरात महिनाभरापासून गणेशोत्सवाची सुरू झाली. त्यामुळे महिनाभर आधीपासूनच गणेशोत्सवासाठी वरदळ सुरू असते. अशा काळात चोरट्याने मंदिरे निशान्यावर धरत चोरीचा घटनाक्रम सुरू केला. चोरट्यांनी राम मंदिरापाठोपाठ, हनुमान, दत्त मंदिरे लक्ष केले आहेत. यामुळे मंदिर व्यवस्थापन मंडळांची झोप उडालेली आहे.

गणेशोत्सवात गणेश मंडळे भीतीच्या छायेत आहेत. शहरात अनेक मोठी मंडळे आहेत.त्या ठिकाणी भाविकांची 11 दिवस गर्दी असते. तेथे मोठ्या प्रमाणात दानधर्म देखील केले जातात. दानपेटीत मोठी रक्कम देखील असते. अंगावर सोन्या-चांदीसह विविध सजावटीचे दागिने देखील असतात. एकीकडे कुलूपबंद असणारी मंदिरे एक दिवसाआड फोडून दानपेठ्या पळवल्या जात असताना केवळ पडदा बंद असणाऱ्या गणेश मंडळांची सुरक्षा ही सध्या ऐरणीवर आलेली दिसत आहे.

काही मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील व्यवस्था नाही जेथे सीसीटीव्ही बंद आहे तेथे चोरटे चोरी करून आपला हात साफ करीत असतात. इचलकरंजी शहरात चोरीच्या घटना ज्या मंदिरात घडल्या त्या ठिकाणी अजिबात सीसीटीव्ही नाहीत. काही ठिकाणी असले तर त्या बंदच आहेत. यामुळे चोरट्यांचा उच्छाद वाढलेला आहे. भाविकांची इच्छापूर्ती करणारे दैवत सध्या सुरक्षित नसल्याचे चित्र आहे.

दानपेठ्या पळवणे, देवतांचे दागिने चोरण्यासह रोख रक्कम चोरी करण्याचा सपाटांनी लावलेला आहे. सुरुवातीला इचलकरंजी शहरातील गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व उत्तर भागात तीन दिवसाआड सलग दोन ठिकाणी चोऱ्या झाल्या. त्यानंतर शिवाजीनगर हद्दीत पश्चिम भागात चोरी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच गाव भागातील दक्षिण भागात चोरी झाली. चार दिशा पूर्ण झाल्यावर चोरट्यांनी शहराच्या पोट दिशेतील मंदिरांना टार्गेट केले आणि त्यानंतर त्वरित शिवाजीनगर भागात नैऋत्य भागात दोन मंदिरात चोरीचा प्रयत्न केला.

त्यानंतर तब्बल पाच दिवसांनी वायव्य भागात चोरीचा प्रयत्न करत एका मंदिरातील दानपेटीस पळवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावभागातील आग्नेय दिशेला असणाऱ्या नदीवेस परिसरातील मंदिरातील दानपेटी चोरली.