आष्ट्यात मागासवर्गीय वसतिगृह निर्मितीच्या मागणीचे निवेदन

सर्वसामान्य जनतेच्या अनेक मागण्या आजदेखील अपूर्ण असल्याचे चित्र अनेक भागात पहायला मिळत आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही या मागण्या होत नाहीत. तर काही मागण्या पाठपुराव्यामुळे पूर्ण देखील झालेल्य्या आहेत. आष्टा शहरात मागासवर्गीय वसतिगृह उभारण्यात यावे यासाठी समाज कल्याण विभाग सांगली कार्यालय अधिक्षक प्रशांत मोहिते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा वाळवा तालुका अध्यक्ष व निशिकांत दादा युथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रविण माने, अमोल लोखंडे, महेश घस्ते, मिथुन भंडारे, राहुल थोरात, अक्षय अवघडे, छत्रपती कुरणे, तानाजी पांढरे, नारायण वायदंडे, नंदकुमार चोपडे, सुशांत टोमके, संतोष कुरणे, चंदू चोपडे,प्रेम चव्हाण, महेश अष्टेकर, किशोर पाटोळे, राहुल टोमके, बिट्ट पांढरे, अनिकेत टोमके उपस्थित होते.