राज्यात लोकसभा निवडणुकीत सुफडा साप झालेल्या महायुती सरकारने तीन महिन्याने लागलेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देत व लाडकी बहीण योजना आणून मते मिळवून सत्ता मिळवली. परंतु सत्ता मिळवल्यानंतर त्या आश्वासनांना केराची टोपली दाखवली. शेतकरी व महिलांची दिशाभूल केली. असा आरोप करत युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने करीत सरकारचा निषेध करत असल्याचे निवेदन अप्पर तहसील कार्यालयात दिले. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, दीपक मेथे, सयाजी गावडे, शशिकांत
भानुसे, गोटू थोटे, टिपू आत्तार, प्रकाश सिद्ध, पदाधिकारी व कार्यकतें उपस्थित होते.
शिवाजी चोरमुले म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणून मताचा जोगवा मागून हे सरकार सत्तेत आलं. लाडकी बहीण योजना ही सरसकट महिलाना सुरू केली होती सत्ता आल्यानंतर आज ५० ते ६० लाख महिलेना या योजनेतून वगळण्याचं लाजीरवानी कृत्य या सरकारने केले आहे. आज १५०० वरून २१०० रुपये देतो म्हणून या सरकारने घोषणा केली. आश्वासन दिले आणि सत्ता मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडण्याच पाप या सरकारने केले आहे. आष्टा शहर युवक कॉंग्रेस शरद पवार पार्टीच्यावतीने या फसव्या सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करतो.