आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सव व अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने आपापल्या मतदारसंघातील गावांचा संपर्क दौरा करण्यावर भर दिला असल्याचे दिसून येत आहे. या दौऱ्यात मतदारांना विविध विकासकामांचे आश्वासने देताना मला निवडणुकीत निवडून द्या असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे. या निमित्ताने निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांचा संपर्क दौऱ्यावर भर
