इंडिया आघाडीकडून मदन कारंडे यांचे नाव आघाडीवर

सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. अशातच अनेक गणेशोत्सव मंडळांना भेटी तसेच अनेक कार्यक्रमांचे आयोजन अनेक नेते मंडळींकडून केले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीकडून मदन कारंडे यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. विक्रमनगर येथील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून संवाद आणि संपर्क कारंडे समर्थकांनी सुरू केलेला दिसत आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यात पुढच्या आठवड्यात येत आहेत. या दरम्यान कारंडे यांच्या नावाची घोषणा करून पाठबळ देतील अशी चर्चा देखील सध्या सुरू असलेली पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने चंदगड, कागल बरोबरच इचलकरंजी हमखास आम्ही जिंकतो आमच्याकडे ती जागा द्या अशी मागणी करत एकूण 85 जागा यामध्ये इचलकरंजीचा समावेश केला असल्याचे सांगण्यात येते.