मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय तपासणी मूल्यमापन पूर्ण झाले. यामध्ये सावर्डे केंद्रातून विद्यामंदिर संभाजीनगर शाळेने विविध निकशाची पूर्तता करत तयारी केली होती. या सर्वांची दखल घेत तालुकास्तरीय समितीने पाहणी करून संभाजीनगर शाळेला तालुक्यात दुसरा क्रमांक जाहीर केलेला आहे.
यासाठी हातकणंगले पंचायत समिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, गटशिक्षणाधिकारी नम्रता गुरसाळे, शिरोळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भारती कोळी, विस्ताराधिकारी अजय कुमार बिरणगे, केंद्रप्रमुख व समिती सदस्य एन वाय पाटील, पोपट पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. संभाजीनगर ही शाळा मळे भागातील पहिली ते चौथीपर्यंत द्वीशिक्षकी असताना मुख्याध्यापक सरदार पाटील, अध्यापक संतोष कोळी यांनी गुणवत्तापूर्ण विविध उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले आहे.