आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?

एलपीजी कंपनीद्वारे आता ग्राहकांना ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर मोबाइलवर येणारा ओटीपी सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या घरी सिलेंडर येईल, तेव्हा ओटीपी सांगावा लागेल.

आजवर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडरसाठी जशी बुकिंग करत होता, यापुढेही त्याच पद्धतीने फोनवरूनच बुकिंग करावं. मात्र आता ही पद्धत सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे.

घरगुती वापराचा सिलेंडर बुक केल्यावर काही दिवसांनंतर एजन्सीचे कर्मचारी तो घरपोच करतात अशी सध्याची पद्धत आहे. मात्र यात आता महत्वाचा बदल होणार आहे. ओटीपीशिवाय सिलेंडरची होम होम डिलेवरी होणार नाही. यापूर्वी पण हा नियम होताच. परंतू तो आता अनिवार्य करण्यात आला आहे.

सिलेंडर ऑनलाईन बुक केल्यावर ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलेव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागेल. अन्यथा ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.