पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना रविवारी (दि.१५) देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, रविवारचा हा मुहूर्त टळला असून केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने काढलेल्या पत्रानुसार आता हा हप्ता मंगळवारी (दि.१७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवशी वितरीत करण्यात येणार आहे.
राज्याचे ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांनी पत्राद्वारे याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदांना केल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलासाठी निधी देण्यात येतो. जिल्ह्यातील लाभार्थ्यांची निश्चिती करण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून पंचायत समिती स्तरावर कामे सुरु होती.
यामध्ये आधार प्रमाणीकरण, जागा निश्चिती तसेच लाभाथ्यांचे कागदपत्रांसह अर्ज प्रक्रीया अशा कामांचा समावेश होता.देशातील १० लाख लाभाथ्यर्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एका क्लिकवर पहिला हप्ता देण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील अडीच लाख लाभार्थ्यांचा समावेश आहे.