मा. आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते युवाशक्ती गणेशोत्सव मंडळ सांगोला यांच्या श्रींची आरती संपन्न!

सांगोल्यात गेली अकरा वर्षे युवाशक्ती गणेशोत्सव मंडळ मिरज रोड सह्याद्री नगर सांगोला व युवानेते अभिजीत कांबळे मित्र परिवार गणेश उत्सव साजरा करीत आहेत. या मंडळामार्फत अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत. महिलांना वाव मिळावा म्हणून महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा असे अनेक कार्यक्रम हे मंडळ घेत असते. लहान मुलांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात.

यावर्षी या मंडळांनी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांना श्रींच्या आरतीसाठी आमंत्रित केले होते. या मंडळाच्या विनंतीला मान देऊन ते आले व त्यांच्या हस्ते श्रींची आरती संपन्न झाली. मंडळ व युवानेते अभिजीत कांबळे मित्र परिवार यांच्या वतीने माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.