नव्या आर्थिक वर्षात नव्यानं करप्रणालीनुसार आर्थिक नियोजन करू इच्छिणाऱ्यांना सध्या नव्या कर प्रणालीचा पर्याय निवडण्याचा सल्ला दिला जात आहे. या नव्या करप्रणालीचे बरेच फायदे आतापर्यंत पाहायला मिळाले असून, त्याचा सर्वात मोठा आणि सातत्यानं अधोरेखित केला जाणारा फायदा म्हणजे 12 लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर न आकारला जाणं.
नव्या कर प्रणालीचा आणखी एक फायदा म्हणजे, NPS असल्यास कॉर्पोरेट अकाऊंटच्या माध्यमातून डिडक्शन घेता येऊ शकतं, ज्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शनची आकडेवारीसुद्धा मोठी आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे नव्या कर प्रणालीमध्ये अधिकाधिक टॅक्स डिडक्शन क्लेम करता येत नाही. त्यामुळं करप्रणाली जुनी असावी की नवी? हाच प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात आहे.
Home Loan मध्ये कसा होतोय फायदा?
New Tax Regime मध्ये होम लोनच्या (Home loans) व्याजदरावर मिळणारी सूट हा एक मोठा फायदा असून, ही सवलत प्रत्यक्ष स्वरुपात मिळत नसली तरीही त्यासाठी एका नियमाचं पालन केल्यास मात्र नव्या कर प्रणालीतूनही फायदा मिळवता येऊ शकतो. जिथं, ‘प्रॉपर्टी लेट आउट’ म्हणजेच मालमत्ता सेल्फ-ऑक्यूपाइड नव्हे तर भाडेतत्वावर दिलेली असावी.
लक्षात घ्या नेमकी कुठे सूट मिळते?
नव्या आणि जुन्या अशा दोन्ही करप्रणालींमध्ये स्टँडर्ड डिडक्शन करण्यात येतं. मात्र त्यापासून मिळणारे फायदे वेगवेगळे असता. नव्या कर प्रणालीत जुन्या प्रणालीच्या तुलनेत डिडक्शन नाहीत. New Tax Regime च्या कलम 24(b) अन्वये सेल्फ-ऑक्यूपाइड प्रॉपर्टीतील व्याजदरावर कोणत्याही पद्धतीनं थेट कपात मिळत नाही. किंबहुना इथं स्टँडर्ड डिडक्शन, NPS एम्प्लॉयर कंट्रीब्यूशनच ग्राह्य धरलं जातं.
सोप्या शब्दांत घर भाड्यानं दिलंय? तर मिळेल फायदा
जर तुम्ही होम लोन (Home loans) असणारं घर भाड्यानं दिलं आहे, तर ‘इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी’ची मोजणी होत असताना तुम्ही व्याजामुळं झालेल्या Net Loss ची रक्कम अॅडजस्ट करू शकता. इथं होम लोनचं पूर्ण व्याज आणि भाडे तत्वामधून मिळणाऱ्या रकमेमधील अंतरास Loss म्हणून ग्राह्य धरलं जातं. ही रक्कम दुसऱ्या मिळकतीतून वजा करत समोर येणारा आकडा Set Off चा असतो.
उदाहरणासह समजून घ्या
₹1 लाख, व्याज ₹3 लाख, होम लोन व्याज भरणा = ₹3,00,000 भाडे तत्त्वातून ₹1,00,000 नेट लॉस (हाउस प्रॉपर्टीतून) = ₹2,00,000 (ही रक्कम व्याजदर भाड्याच्या रकमेतून वजा करून मिळाली.) ज्यामुळं तुम्ही 2 लाख रुपयांचा तोटा नव्या कर प्रणालीत अॅडजस्ट करून थेट फायदा मिळवू शकता.
इथं महत्त्वाची बाब म्हणजे नव्या कर प्रणालीमध्ये गृह कर्जावर कोणताही थेट फायदा किंवा सूट नसून लेट-आउट प्रॉपर्टीवर लॉस सेट-ऑफचा अप्रत्यक्ष फायदा मात्र मिळवता येऊ शकतो. त्यामुळं यासंदर्भातील सविस्तर माहिती आणि मार्गदर्शनासाठी आर्थिक सल्लागारांची मदत अवश्य घ्या.