सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध प्रत्येक पक्षाला लागून राहिलेले आहेत.परंतु कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार ह्यातून मात्र तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी उदयास आल्यानंतर दोन्ही आघाड्या पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. तथापि एका जागेसाठी तीन तीन घटक पक्ष दावेदारी करीत आहेत. दोन्ही बाजूला सध्या असे चित्र पहावयास मिळत आहे.
जागा वाटपाच्या वाटाघाटीत समन्वय नाही झाला तर मैत्रीपूर्णच्या नावाखाली हातात हात घालून काम करणारे पक्ष विधानसभेला एकमेकांसमोर शड्डू ठोकणार यात मात्र शंका नाही. याच पार्श्वभूमीवर राजकारणाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून प्रबळ दावेदार मानले जाणारे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी अधिकृत उमेदवारी मिळेल आणि गुलालही लागणार असा दावा केलेला आहे.