सध्या सगळ्या गिरण्या बंद झाल्या असून आता यंत्रमाग बंद होत आहेत. अशा कठीण परिस्थितीत कामगार वर्गाने जायचे
आणि सरकारला जाब विचारण्यासाठी मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये महाराष्ट्र स्टेट टेक्स्टाईल संडस्ट्रीज वर्कर्स फेडरेशनच्यावतीने राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संपूर्ण दिवसभर भरलेल्या या बैठकीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधील कापड धंद्यातील लोक हजर होते.
एनटीसीच्या बंद गिरण्या, एमएसटीसीच्या बंद गिरण्या याबाबत शासन वेळ काढूपणा करत आहे. खाजगी मालकांनी घेतलेल्या गिरण्या आणि त्यातील जागा ही त्यांनी विक्री करण्यास सुरूवात केली असून कापड धंद्याची परिस्थिती ही चिंताजनक असून कामगारांना न्याय न मिळाल्यास महाराष्ट्रातील कापड कामगारांनी संघर्षाची तयारी ठेवली असल्याचे प्रतिपादन इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केले.
या बैठकीस इचलकरंजीचे शामराव कुलकर्णी, नागपूरचे सुदाम शिंगणे, पुलगावचे रामजी वाघ, अचलपूरचे कोल्हापूरे, चाळीसगावचे सुरेश चौधरी, औरंगाबादचे सय्यद अहमद, विठ्ठलराव कदम, मुंबईचे निवृत्ती देसाई, कमळेश्वरचे दत्ताजी राऊत, धुळ्याचे मच्छींद्र यड्रावकर, बार्शीचे सोनावणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आजही महाराष्ट्रात भिवंडी, मालेगाव, सोलापूर, विटा, इचलकरंजी या ठिकाणी दहा लाख यंत्रमाग आहेत पण गेल्या दहा वर्षात या यंत्रमाग कामगारांच्या कल्याण मंडळासाठी आणि किमान वेतनासाठी राज्य शासन काहीही करत नाही .