पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; अनेक योजनांचा करणार शुभारंभ

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ करणार आहेत. ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात सहभागी होतील.पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचा दौरा केला होता. तेव्हा 76 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आज पुन्हा ते महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी वर्ध्यातील विश्वकर्मा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वर्ध्यात पोहोचतील. येथे ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्जाचे वितरण केले जाणार आहे. एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते एक स्मरणीय टपाल तिकीटही जारी करतील. तसेच अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजनेचा शुभारंभ देखील केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ करतील. याद्वारे 15 ते 45 वयोगटातील तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते स्वावलंबी बनू शकतील.

राज्यातील सुमारे दीड लाख तरुणांना दरवर्षी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार आहे.पंतप्रधान मोदी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ करतील. या योजनेअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना मदत केली जाईल. या योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.