सोलापुरकरांसाठी खुशखबर! विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘या’ तारखेला होणार उद्घाटन

सोलापुरात अखेर तो दिवस उजाडला असून अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. सोलापूरच्या विमानतळावरून विमान उडण्यास परवानगी देण्यात आली असून

या नूतनीकरण झालेल्या विमानतळाचे उद्घाटन येत्या 26 सप्टेंबर रोजी पुणे येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.सुरुवातीला सोलापूर पुणे अशी विमानसेवा सुरू होणार असल्याचे समजते. केवळ 40 मिनिटात सोलापूर मधून पुण्याला जाता येणार आहे. यानंतर सोलापूर मुंबई विमानसेवा नोव्हेंबर अखेर सुरू करण्याचा प्रयत्न राहील असे सांगण्यात येते.

जुन 2023 मध्ये विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली. त्यानंतर विमान सेवा कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता लागली होती. अनेक महिन्यांपासून विमानतळाच्या नूतनीकरणाचे करण्याचे काम सुरू होते.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः लक्ष घालून विमानतळातील कामे करून घेतली.

भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नानंतर आता विमान सेवा सुरू होत आहे.सोलापूर विकास मंचने सुद्धा विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात अनेक वेळा पाठपुरावा केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांचाही यामध्ये वाटा असल्याचे म्हणावे लागेल.