माढा वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने शनिवारी 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी टेंभुर्णी येथील पुष्पक मंगल कार्यालय येथे 500 सायकलीचे मोफत वाटप होणार आहे. सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माढा वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य धनराजदादा शिंदे यांनी केले .
माढा वेल्फेअर फाउंडेशनने माढा तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रात मागील सहा वर्षापासून महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुलींना शाळेत जाण्यासाठी आजपर्यंत तीन टप्प्यांमध्ये 2 हजारहुन अधिक सायकलीचे मोफत वाटप करण्यात आले आहे. याच अंतर्गत शनिवारी सायकल डोनेशन चौथ्या टप्प्यातील 500 सायकलीचे मोफत वाटप करण्यात येणार असून कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.