आष्टा व परिसरात शनिवारी दुपारनंतर, तसेच सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनच्या पिकाला फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून जोरदार उन्हाच्या तडाका असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली होती, मात्र शनिवारी सकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. दुपारी तसेच सायंकाळी जोरदार पाऊस झाला त्यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन, भुईमूग या पिकांचे नुकसान झाले. कारंदवाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, नागाव, पोखर्णी, ढवळी या परिसरांतही पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप होती परंतू शनिवारी पावसाने तडाखा दिल्याने पिकांचे नुकसान झाले.