आष्टा येथील आमदार जयंत पाटील गटाचे संग्राम नानासाहेब फडतरे यांची राजारामबापू दूध संघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. संग्राम फडतरे यांनी कार्यकर्त्यांसह इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. आम. जयंत पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ नेते दिलीपराव वग्यानी, विराज शिंदे, मोहन गायकवाड, राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ जाधव, बबन थोटे, तानाजीराव सूर्यवंशी, शिवाजीराव ढोले, शिवाजीराव चोरमुले, विष्णू मस्के, अर्जुन माने, प्रभाकर जाधव, सयाजी गावडे, शशिकांत भानुसे, सुनील माने, बाळासाहेब इंगळे, गुंडा मस्के, संदीप तांबवेकर, बाबासाहेब सिद्ध, पंकज माळी, भैय्या फडतरे, पिंटू शेळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
राजारामबापू संघाच्या चेअरमनपदी संग्राम फडतरे यांची निवड
