आष्टा येथे दर्जेदार विकास कामाचा शुभारंभ; नागरिकांमधून समाधान

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सुरेश खाडे आणि निशिकांत भोसले पाटील यांच्या सहकार्यातून आष्टा शहरात विविध विकास कामे होत आहेत. आष्टा येथील सिध्देश्वर मंदिर ते बलभीम तालीम रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी सांगली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १२ चिमुकल्याच्या हस्ते नारळ फोडून लाख ६९ हजार रुपये खर्च रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे शहरातील नागरिक समाधानी आहेत. या पुढील काळातही आष्टा शहराचा विकास होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, असे निशिकांत दादा युथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रविण माने यांनी केले. 

प्रवीण माने म्हणाले, इथे आश्वासन नाही तर फक्त काम यांच्या सहकार्यातून आष्टा बोलतंय, निशिकांत भोसले पाटील विविध विकासकामे सुरू आहेत. त्यांनी आष्टा शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्थरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. सर्व विकासकामे दर्जेदार होत आहेत. राजकारणापेक्षा शहराच्या विकासाला अधिक महत्त्व देत आहोत. निवडणुकी पुरते राजकारण आणि त्यानंतर समाजकारण अशी भूमिका निभावली आहे. शहरातील सर्वसामान्य जनता पाठीशी राहिल्यामुळे शहरात अनेक विकास कामे करता आली.

यापुढील काळातही नागरिकांच्या समस्या सोडवताना केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून शहराचा विकास करणार आहोत. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते सतीश बापट, सांगली जिल्हा शिवसेना महिला अध्यक्ष अर्चना माळी, उदय कवठेकर, दादासो वाघमारे, विनोद बसुगडे, संजय सावंत, धनाजी मुळीक, अजय कुशिरे सोन्या किरतसिंग, विजय ढपले, ऋषिकेश माळी, नागरिक उपस्थित होते.