शाकंभरी महोत्सवानिमित्त आष्ट्यात विविध कार्यक्रम

सध्या वेगवेगळ्या भागातील यात्रेचे दिवस आहेत. त्यामुळे यात्रेसाठी बाहेरगावी गेलेली मंडळी गावाकडे यात्रेसाठी परतत आहेत. सध्या आष्टा येथील श्री चौंडेश्वरी देवी शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरु आजपासून झालेला आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. आष्टा येथील श्री चौंडेश्वरी देवी शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त  मंगळवार दि. ७ ते १३ अखेर नवचंडी होम, शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन केले आहे. 

चौंडेश्वरी देवी शाकंभरी नवरात्र  महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कीर्तनकार हभप विनोद कृष्णशास्त्रीजी यांचे दि. ७ ते १२ रोजी दुपारी ४.३० ते सायंकाळी ७.३०’ शिवमहापुराण कथा होणार आहे. दि. ६ रोजी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दररोज पहाटे महाभिषेक, मंत्राचा सामुदायिक जप, सकाळी व सायंकाळी छबिना व आरती. ७ ते १३ अखेर सकाळी ९.३० ते ११ श्री दुर्गा सप्तशती पाठ, दुपारी १ ते ३ भजन तसेच ७ रोजी रात्री ९.३० ते ११ शिवचरित्रातील मातृशक्ती यावर डॉ. अमर आडके यांचे व्याख्यान, ८ रोजी “भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार’ या विषयावर ईश्वर रायण्णावर.

९ रोजी प्रा. संजय थोरात यांचे विनोदी व्याख्यान १० रोजी भक्तिगीतांचा कार्यक्रम, ११ रोजी सुनील लाड यांचे व्याख्यान व रात्री ११ ते १ गोंधळ, तर रविवारी हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम. दि. १३ रोजी पहाटे ५ ते ११ पूर्णाहुती, सकाळी ९ वाजता सहस्त्रकुमारी पूजन होणार आहे.