लाडक्या बहिणीसाठी आनंदवार्ता, रक्षाबंधनापूर्वी सोने झाले स्वस्त, चांदी महागली……

रक्षाबंधनाचा सण आता अगदी जवळ आला आहे. लाडक्या बहिणीसाठी राज्य शासनाने हप्ता जमा केला आहे. अनेक बहि‍णींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. लाडक्या बहिणीला तुम्हाला महागडं गिफ्ट द्यायचं असेल तर सोने स्वस्त झाले आहे. दोन दिवसापासून सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. तर चांदीने उसळी घेतली आहे. या आठवड्यात मौल्यवान धातूत चढउताराचे सत्र सुरू आहे. काय आहेत या मौल्यवान धातूची किंमत? या आठवड्यात भाव कमी जास्त होत आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने 270 रुपयांनी तर 13 ऑगस्ट रोजी 104 रुपयांनी महागले.

14 ऑगस्ट रोजी किंमती 110 रुपयांनी कमी झाल्या. काल भावत कोणताच बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात मौल्यवान धातूत घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत चढउताराचे सत्र दिसले. सोमवारी चांदी किलोमागे 600 रुपयांनी स्वस्त झाली. तर दुसऱ्या दिवशी 13 ऑगस्टला चांदीने 1 हजार रुपयांची मुसंडी मारली. 14 ऑगस्ट रोजी 500 रुपयांनी किंमती उतरल्या. 15 ऑगस्ट रोजी तितकीच दरवाढ झाली.

गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,500 रुपये आहे. आज सकाळच्या सत्रात चांदीत दरवाढीचे संकेत आहेत.इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70793, 23 कॅरेट 70,510, 22 कॅरेट सोने 64,846 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,095 रुपये, 14 कॅरेट सोने 41,414 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 80,921 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.