कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या तरुणांचं सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सध्या कोल्हापूरमधील जिल्हा परिषदेमध्ये नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत डेटा एन्ट्री या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती शिक्षण विभागाचे प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेद्वारे भरती राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली असून लाखोंच्या संख्येने तरुणवर्ग फॉर्म भरत आहेत.
पात्रता :
बऱ्याच तरुणांना असं वाटतं की, सरकारी नोकरी म्हणजे स्पर्धा परीक्षा. केवळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे व्यक्ती आणि तरुण मंडळीच जिल्हा परिषद किंवा नगरपरिषदेचे फॉर्म भरू शकतात. परंतु इथे केवळ 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी देखील अर्ज प्रक्रियेसाठी पात्र आहे. अर्जदार 12 वी ते 15 वी पदवीधर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवारा जवळ मराठी तसेच इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट असणे महत्त्वाचे आहे. कोल्हापूरमधील जिल्हा परिषदेत निवड झालेल्या उमेदवाराला सुरुवातीलाच 25 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा १० जानेवारी २०२५ रोजी होऊ शकतात.
अर्जाची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया 12 डिसेंबर 2024 म्हणजेच कालपासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर संधीचा फायदा घ्यावा. भरती प्रक्रियेसंबंधितची संपूर्ण माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
ज्या उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल त्यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर येथे अर्ज पाठवून द्यायचा आहे. अर्जाबरोबर 10 वी 12 वी तसेच एमएससीआयटी आणि टायपिंगचे सर्व सर्टिफिकेट अटॅच करून अर्ज पाठवून द्यायचा आहे.