केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या आज २५ सप्टेंबर रोजीच्या कोल्हापूर दौऱ्यात निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान यावर पोलिसांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानीच्या जवळपास ८०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांना पेठवडगाव पोलिसांनी अटक केली आहे.
