सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वेग हे प्रत्येक पक्षाला लागलेले आहे. जोरदार मोर्चेबांधणी प्रत्येक पक्षांकडून सुरू झालेली आहे. सभा, मेळावे यावरती भर देखील दिला जात आहे. आमदार आवाडे पिता पुत्र यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी भाजपची उमेदवारी निश्चित केली. या निर्णयानंतर भाजपमध्ये काही प्रमाणात नाराजीचा सूर असला तरी विधानसभा निवडणुकीत ही नाराजी दिसणार नाही याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेतल्यानंतरच आवडे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला. परंतु या सर्व घडामोडींचा हातकणंगले विधानसभा मतदारसंघावर देखील परिणाम होणार आहे.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच हा शिवसेनेकडे आहे. दोन वेळा विजयही मिळवलेला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला पाहिजे अशी भूमिका शिवसैनिकांची आहे. हातकणंगले भाजपच्या मित्र पक्षाला देणार असाल तर इचलकरंजी शिवसेनेला मिळाला पाहिजे अशी ही मागणी झाली होती. मात्र आवाडेंनी भाजप प्रवेश केल्यामुळे भाजप इचलकरंजी सोडणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे आता हातकणंगलेही शिवसेना भाजपाला देणार नाही हे नक्की झाले आहे.
शिवसेनेकडून लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अविनाश बनगे यांचे नाव पुढे आले आहे. त्यांना उमेदवारी देण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे. तथापि ऐनवेळी माजी आमदार सुजित मिणचेकर यांना मुख्यमंत्री मैदानात उतरवतील याची शक्यताही नाकारता येत नाही.