माजी आमदार सदाशिवभाऊ, राजेंद्रअण्णा, वैभवदादा आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची मी भेट घेतलेली आहे खानापूर मतदारसंघातील मिंदे गटाच्या इच्छुक उमेदवाराविरोधात सर्वांचाच 36 चा आकडा आहे. मिंदे गटाच्या उमेदवाराला पाडण्याची सर्वच नेत्यांची भूमिका आहे. एकास एक लढत देण्यासाठी आम्ही सर्व नेत्यांची भेट घेतली परंतु मतदारसंघातील कोणत्याही नेत्यांनी याबाबत रिस्पॉन्स दिलेला नाही.
कदाचित खानापूर आटपाडी मतदारसंघातील नेत्यांना ईडीची भीती दाखवण्याची शक्यता आहे असं खळबजनक आरोप करत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजयबापू विभुते यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. शत्रूचा पराभव करायचा असेल तर टार्गेट फिक्स केलं पाहिजे.
खानापूर मतदारसंघ शिवसेनेला सुटणार आहे त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी थांबा मीच इलेक्शन लढवणार सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आमदार होण्यासाठी मतदारसंघातील नेत्यांनी मला पाठिंबा द्यावा अशी मागणी करत संजय बापू विभुते यांनी मतदारसंघात मशाल ताकतीने पेटेल असा विश्वास व्यक्त केला आहे.