अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी साके जगन्नाथ यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. नेमणूक करण्यात आल्यानंतर त्यांनी इचलकरंजी काँग्रेस कमिटीमध्ये येऊन आढावा बैठक घेतली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विधानसभा मतदारसंघाची पूर्ण माहिती देऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजी काँग्रेस पक्ष हा सक्षम आहे निर्भीड आहे हे दाखवून देऊन मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच राहावा यासाठी मागणी देखील केली. यावेळी या आढावा बैठकीत शशांक बावचकर, संजय कांबळे, राहुल खंजिरे यांच्यासह अन्य प्रमुख नेते काँग्रेस कमिटीत उपस्थित होते.
Related Posts
पंचगंगा नदी प्रदूषणाचे पंचनामे सुरू…
सामाजिक कार्यकर्त्याच्या दबावानंतर पंचगंगा नदीप्रदूषणाबाबत पुन्हा एकदा अधिकारी सक्रीय झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रदूषित पाण्याचे पंचनामे सुरू करण्यात आले…
इचलकरंजीतील रस्ता रुंदीकरणाची फाईल भू-संपादनमध्ये धूळ खात….
इचलकरंजी येथील वाढत्या वाहतुकीमुळे राजवाडा चौकाजवळील रस्ता रुंदीकरण करण्यासंदर्भात महापालिकेने तीन वर्षांपूर्वी भू-संपादन विभागाला निवाडा घोषित करण्यासंदर्भात पत्र दिले असताना…
इचलकरंजीतील शास्ती रद्द करणारच; शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने
सध्या इचलकरंजी महानगरपालिकेने शास्तीसह घरफाळा मागणीची बिले लागू केली आहेत. इचलकरंजी औद्योगिक शहर असून शहरांमध्ये कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात आहे.…