विक्रमी मताधिक्याने विधानसभेत पाठवा राहुल आवाडे यांचे आवाहन….

महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ कबनूर येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रचार पदयात्रा काढण्यात आली. आजवर ज्यांनी काहीच विकासकामे केली नाहीत ते विकास कामांच्या गप्पा मारत आहेत विरोधकांकडे विकासाचा मुद्दाच नसल्याने ते केवळ व्यक्तिगत टीका करत आहेत.

याउलट महायुती सरकारच्या काळात इचलकरंजीत विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आमदार प्रकाश आवाडे यांनी कायापालट केला. प्रगतीची ही विकासगंगा अशीच सुरू राहावी यासाठी सर्वांनी मला मतांचा आशीर्वाद देऊन विक्रमी मताधिक्याने विधानसभेत पाठवावे असे आवाहन राहुल आवाडे यांनी केले.

कबनुरमधील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौक येथे नारळ फोडून भव्य प्रचार पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राहुल आवाडे यांनी ग्रामदैवत जंदीसाहेब व ब्राँनसाहेब यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. या प्रचार पदयात्रेला संपूर्ण कबनूर गावातून उदंड प्रतिसाद लाभला.