‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ मध्ये जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी राज्यात भरीव कामगिरी केली असून एकूण साडेतेरा कोटींची बक्षिसे पटकावली आहेत. राज्यस्तरावर इचलकरंजी महापालिका तिसऱ्या क्रमांकावर येत तीन कोटी रुपयांचे बक्षीस पटकावले आहे.तर कोल्हापूरजिल्हा परिषदेने पुणे विभागामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून पंचमहाभुतांवर आधारित ही स्पर्धा घेण्यात येते. सन २०२३/२४ चे हे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले.
इचलकरंजी महापालिकेने तिसऱ्या क्रमांकावर येत पटकावले तीन कोटी रुपयांचे बक्षीस
