नवरात्र उत्सवानिमित्त सोलापूर शहरातील ‘हे’ 7 मार्ग वाहतुकीसाठी बंद! 3 ते 12 ऑक्टोबरपर्यंत…..

सोलापूर शहरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ३ ते १३ ऑक्टोबर या काळात रूपाभवानी मंदिरात दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे गुरुवारपासून (ता.३) रूपाभवानी मंदिराकडे जाणारे पाच मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. याशिवाय उत्सवानिमित्त बाळीवेस, मधला मारुती चौक, कोंतम चौक, टिळक चौक या परिसरात साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे तेथील दोन मार्ग देखील १३ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

रूपाभवानी मंदिराकडे जाणारे पाच रस्ते बंद केल्यानंतर त्या मार्गावरील वाहनांसाठी पोलिस आयुक्तांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. मड्डी वस्तीकडून घोंगडे वस्ती-कुंभार वेसमार्गे बलिदान चौक व पुढे कस्तुरबा मार्केटमार्गे सम्राट चौक आणि सम्राट चौकाकडून जुना कारंबा नाका-तुळजापूर नाकामार्गे मड्डी वस्ती हा मार्ग वाहनांसाठी उपलब्ध असणार आहेत. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाच्या दृष्टीने शहर पोलिसांनी चोख नियोजन केले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील नेमला जाणार आहे. वाहतूक कोंडी होवू नये म्हणून शहर वाहतूक पोलिसांनीही नियोजन केले आहे.

‘हे’ मार्ग राहणार बंद

सम्राट चौक ते रूपाभवानी चौक

मड्डी वस्ती क्रॉस रोड ते रूपाभवानी चौक

बलिदान चौक ते रूपाभवानी चौक

हैदराबाद रोड ते रूपाभवानी चौक

रूपाभवानी चौकाचा १०० मीटर परिसर ‘नो पार्किंग झोन’ राहणार