पहिल्याच दिवशी ‘धर्मवीर 2’ सिनेमाची छप्परफाड कमाई…

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त फक्त ‘धर्मवीर’ सिनेमाची चर्चा होती. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. अखेर सिनेमा 27 सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांची प्रतीक्षा संपली. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी देखील सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी केली आहे. शिवाय सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहे. ‘धर्मवीर 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 1 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. ‘धर्मवीर 2’ सिनेमाने पहिल्या दिवशी 1.92 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे

‘धर्मवीर 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी 1.92 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. तर सिनेमा 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात आला आहे. त्यामुळे आता येत्या दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘धर्मवीर 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा ‘धर्मवीर’ सिनेमाचा सिक्वल आहे. सिनेमात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची जीवनपट उलगडण्यात आला आहे. ‘धर्मवीर’ सिनेमा प्रवीण तरडे यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला. तर सिनेमात प्रसाद ओक, क्षितीश दाते, मकरंद पाध्ये, स्नेहल तरडे, आणि श्रुती मराठे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. आनंद दिघे यांचं ऑगस्ट 2001 मध्ये ठाण्यातील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ‘धर्मवीर 2’ सिनेमामध्ये त्यांच्या आयुष्याशी आणि राजकीय कारकिर्दीशी निगडीत गोष्टी मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे.