ठाकरे गटाच्या नेत्याच मोठं वक्तव्य… ‘उद्धव ठाकरे हे प्रेशर खाली आल’

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. सध्या दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. कुठला पक्ष किती जागांवर लढणार? याची चर्चा महत्त्वाच्या टप्यावर आहे. या दरम्यान ठाकरे गटाच्या कोकणातील एका मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरे मला दबावाखाली वाटतात असं म्हटलं आहे. “लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यावेळी काँग्रेसची एकही जागा नव्हती. बाळू धानोरकर यांचं निधन झालं. पवारांच्या चार जागा होत्या. एक खासदार तिथे गेला. तीन पवार साहेबांसोबत राहिला. उद्धव ठाकरेंकडे 18 पैकी सहा राहिल्या” असं भास्कर जाधव म्हणाले.

“उद्धव ठाकरेंच्या कमी जागा निवडून आल्या. स्ट्राइक रेटच्या हिशोबाने राष्ट्रवादीच्या जास्त आल्या. शुन्य सदस्य असलेल्या काँग्रेसच्या जास्त आल्या. थोडसं कळत नकळत मी जबाबदारीने विधान करतोय. माझ्यासाठी राजकीय दृष्ट्या अडचणीचं आहे. थोडसं, उद्धव ठाकरे हे प्रेशर खाली आले आहेत असं दिसतं. पण उद्धव साहेबांना सांगेल प्रेशर खाली येण्याची गरज नाही. आज महाराष्ट्राला तुमच्या मुळेच महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या हे महाराष्ट्राला माहीत आहे. तुमच्यामुळेच या जागा मिळाल्या आहेत” असं भास्कर जाधव म्हणाले.

“म्हणून आजही महाराष्ट्र तेच पाहात आहेत. तुम्ही कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करा. पण कमीत कमी जागा घेण्याचा विचार करण्याचं कारण नाही. शेवटी 2019 मध्ये एक नंबरला आपला पक्ष होता. दोन नंबरला पवारांचा पक्ष होता आणि तीन नंबरला काँग्रेस होती. त्यामुळे काँग्रेसचे लोक 12 पैकी एकही जागा देणार नाही म्हणतात त्यांना सांगतो 2019 कोणीही विसरू नये” असं भास्कर जाधव म्हणाले.