मुंबई… अनेकांसाठी स्वप्नांचं शहर. काहींसाठी हे शहर म्हणजे पोट भरण्याची जागा. तर, काहींसाठी हक्काचं ठिकाण. अशा या शहरात सध्या नेमकं काय सुरुये? पाहा
Mumbai News : मुंबईत दर दिवशी मोठ्या संख्येनं नागरिक येतात, कैक वर्षांपासून सुरु असणारं हे चक्र अद्यापही सुरुच आहे. यापैकी काहीजण मुंबई पाहण्यासाठी येतात, तर काहीजण या शहरात आपली नवी ओळख बनवण्यासाठी अर्थात नोकरीधंदा (Jobs in Mumbai) शोधण्यासाठी येतात. या शहरात येऊन इथंच स्थायिक झालेल्यांचा आकडाही मोठा आहे. किंबहुना या आकड्यामध्ये दर दिवसागणिक भरही पडताना दिसत आहेत. परिणामी मायानगरी मुंबईची लोकसंख्या दिवसागणिकर वाढतेय हे नाकारता येत नाही.
शहराच्या गल्लीबोळात आता वस्त्या असून इथं गगनचुंबी इमारतींपासून लहानग्या घरांमध्ये राहणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्याच दृष्टीनं पालिकेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रचंड लोकसंख्या आणि नागरिकांचा पाणीप्रश्न लक्षात घेता आता मुंबईत (Mumbai Water supply) पाणीपुरवठ्यामध्ये खंड पडू नये यासाठी मनोरीजवळ समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठीचा एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीच्या निविदा प्रक्रियेलाही आता सुरुवात झाली आहे.