हरिपाठ पठण आणि दिंडी सोहळ्यास इचलकरंजीवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

ज्ञानेश्वरी शुद्धीकरण दिनाच्या निमित्ताने संतांचे विचार हे घरोघरी पोहोचवावेत आणि समाज सृजनशील निकोप विचारांचा व व्यसनमुक्त व्हावा यासाठी श्री काळामारुती आरती भक्त महिला मंडळ यांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे व डॉ. राहुल आवाडे यांच्या माध्यमातून एकाच वेळी तब्बल दहा हजार महिलांच्या उपस्थितीत इचलकरंजी येथे काल रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ सामुदायिक पठण व भव्यदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने प्रति पंढरीवारीची अनुभूती इचलकरंजीवासियांना अनुभवायला मिळाली. तब्बल दहा हजार महिलांच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यती असा हरिपाठ पठण आणि भव्य असा दिंडी सोहळा इचलकरंजीवासीयांना अनुभवायला मिळाला. या दिंडी सोहळ्यात बाल चिमुकल्याणसह आबाल वृद्ध, तरुणी, महिला संत महात्म्यांच्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेले होते. असंख्य महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती घेतलेली होती. तर हजारो पताका आणि 151 पकवाजाने वातावरणात वेगळाच रंग भरलेला होता. पंढरीच्या विठ्ठल मंदिराची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधत होती.